देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,08,846 वर

0
40

आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. मागील 24 तासांत देशामध्ये 23,285 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,13,08,846 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत 1,58,306 इतक्या जणांचा मृत्यू

तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 15,157 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,09,53,303 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,97,237 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.