देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,12,29,398 वर

0
39

सध्या राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागील 24 तासांत देशामध्ये 18,599 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 97 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच आता देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,12,29,398 वर पोहोचली आहे.

काल दिवसभरात 14,278 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,08,82,798 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,88,747 जण कोरोनावर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.