देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,14,74,605 वर

0
37

देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांत 35,871 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 172 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,14,74,605 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,59,216 इतका झाला आहे.

देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.