राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,96,340 वर

0
42

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 23,96,340 वर पोहोचली असून गुरुवारी राज्यात दिवसभरात 25,833 नवे रुग्ण आढळले आहेत.

तसेच मुंबईची एकूण रुग्णसंख्या सध्या 3,52,835 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत 11,555 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील रुग्णसंख्या  एकूण 4,53,532 वर पोहोचली असून तर काल दिवसभरात 31 कोरोनाबाधितांचा मृत्यू  झाला आहे.