राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर

0
22

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 25,04,327 वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यात दिवसभरात एकूण 24,645 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 19,463 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच 58 कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

तसेच मुंबई आणि पुण्यात तर हा रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईत काल दिवसभरात ३,२६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर, पुणे जिल्ह्यात 4,321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,799 वर पोहोचली आहे.