राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,88,183 वर

0
34

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. तसेच गुरुवारी 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यात दिवसभरात 8 हजार 998 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 88 हजार 183 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत राज्यात एकूण 52 हजार 340 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 20 लाख 49 हजार 484 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 85 हजार 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी दिवसभरात 1 हजार 104 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, असून 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3 लाख 29 हजार 843 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 487 जणांनी आपला जीव गमावला असून 3 लाख 07 हजार 027 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.