पोलिस निरीक्षक ठरले देवदूत ,रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण

0
17

नांदेड: आज ९ मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास वसमत फाटा येथे मुनिर धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऐका मोटर सायकलस्वारास धडक दिली ज्यात मोटार सायकल स्वार व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी नेण्यासाठी स्वतः पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी उचलून ऍबूलन्समध्ये टाकले. या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वसमत फाटा येथे ट्रक क्र आरजे 11जीबी 2127 हे वाहन नांदेड ते नागपूरकडे जात असतेवेळी अर्धापुर ते नांदेडकडे मोटर सायकलवर जाणारे माधव नरशींगराव चिकाळकर (42) यांना ट्रकने जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी महामार्ग पोनी अरुण केंद्रे साहेब यांनी तत्काळ त्यांना स्वतः उचलून महामार्ग च्या रूग्णवाहिकेत टाकून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना
चालक शिंदे, डुकरे, माणिकपेठे , गजानन कदम, ज्ञानेश्वर तिडके, केंद्रे, कल्याणकर यांनी मदत केली. पोलिस निरीक्षक श्री केंद्रे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.