‘पोगारु’ चित्रपटातील ‘ती’ दृश्ये निर्मात्यांनी हटवली

0
70

कोरोनाच्या महामारीनंतर अनलॉकमध्ये पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.यामध्ये आता अनेक मोठे चित्रपट समोर येणार आहेत यातीलच प्रदर्शित झालेला ‘पोगारू’ हा कन्नड भाषेतील बिग बजेट चित्रपट आहे.मात्र या चित्रपटातील ब्राह्मण समाजातील सदस्यांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यानंतर ‘पोगारू’ या कन्नड चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील काही दृश्य हटवण्याचे मान्य केले आहे. या काही दृश्य वगळण्याचा निर्णयानंतर ब्राम्हण समाजातील काही सदस्यांनी त्यांचे म्हणणे सर्वांसमोर मांडले.नंद किशोर यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘पोगारू’ या चित्रपटाची निर्मिती बी.के. गंगाधर यांनी केली आहे. चित्रपटात ध्रुव सरजा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.