भारतीय भांडवली बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला

0
30

आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय भांडवली बाजारात होतांना दिसून येतोय. शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक गडगडले. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी खाली घसरून 50 हजाराच्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली असून निफ्टी सध्या 14800 च्या पातळीवर आहे.


या घसरणीमुळे भारती एअरटेलचा अपवाद वगळता जवळपास सर्व कंपन्यांच्या समभागांना फटका बसला. बँकिंग क्षेत्रात आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेच्या समभागांची किंमत सर्वाधिक घसरली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभागही गडगडला.