प्रसिद्ध व्यवसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात

0
42

पुणे: पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली होती. यानंतर ईडीकडून अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे. मात्र यामध्ये आता अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना मध्यरात्री पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई होत आहे. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यवसायिक आहेत.छाप्यात मिळालेले कागदपत्र तसेच इतर महत्वाचे दस्तावेज मुंबईला नेण्यात आले आहेत.