जैश उल हिंद दहशतवादी संघटनेने स्विकारली मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांची जबाबदारी

0
33

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.याबाबद जैश उल हिंद संघटनेने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात संघटनेने एसयूव्ही कारमध्ये स्फोटके ठेवणारे दहशतवादी सुखरुप घरी पोहोचले आहेत असा दावा केला आहे.

या पत्रकात संघटनेने,हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असं म्हणत मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जर अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या वेळी मुलाच्या कारवर हल्ला करु अशी धमकीही दिली आहे.तसेच ‘तुम्हाला माहितीये की पुढं काय करायचे आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितलेत ते ट्रान्सफर करा आणि तुमच्या ‘फॅट किड्स’सोबत आनंदात राहा,’ असेही म्हटले आहे