‘कोकीनजीवी’ ट्विटर करतेय ट्रेंड!, पामेला गोस्वामीला पोलिस कोठडी

0
47

कोकेन तस्करी प्रकरणी अटक केलेल्या भाजपच्या युवा महिला नेत्या पामेला गोस्वामी यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव पामेला यांना त्यांचा मित्र प्रबीर कुमार डे यांच्यासह शुक्रवारी अटक करण्यात आली होती. माहितीवरुन कारवाई करत पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली आणि झडती घेतली. त्यात त्यांची पर्स आणि कारमधून १०० ग्रॅम कोकेन सापडले असे पोलिसांनी सांगितले.पामेला गोस्वामी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत. पामेला या खूप सक्रिय आहेत आणि सोशल मीडियावर पक्षाशी संबंधित अपडेट पोस्ट करत असतात. मात्र यांच्या अटकेनंतर ट्विटर वर कोकिनजीवी हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.