रितेश जेनेलियाची काळजी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक

0
38

रितेश आणि जेनेलिया इंडस्ट्रीतील सर्वात गोड कपल म्हणून ओळखले जातात. तसेच ते दोघेही सतत सोशल मिडीयावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच काही दिवसांपूर्वी जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली होती. स्केटिंग शिकत असताना ती पडली होती, त्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे, अशी माहिती तिने स्वतः हा दिली होती.

त्यामुळे रितेश सध्या जेनेलियाच्या प्रत्येक कामात तिची मदत करताना दिसतोय. असाच एक व्हिडीओ जेनेलियाने शेअर केला आहे.  रितेश जेनेलियाचे केस विंचरताना त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. त्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.