त्या क्लिपमधील आवाज माझा नाही – राजेश टोपे

0
48

राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन सतत प्रशासनाकडून होते आहे.मात्र सध्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावाने एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मास्क न वापणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत राजेश टोपे बोलत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या ऑडिओ क्लीपबद्दल राजेश टोपे यांनी खुद्द स्पष्टीकरण दिलं असून ती ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नाही, असं सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही,” अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.