राज्यातील सर्वात तरुण प्रांताला लाच स्विकारताना अटक

0
42

राज्यातील सर्वात तरुण प्रांताला लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. 65 हजाराची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद लाचलुचपत विभागाच्या जालना पथकाने बीडमध्ये येवून ही धडक कारवाई केली आहे. पंढरपूचा मूळचा रहिवासी असलेला प्रांत माजलगावच्या वाळू माफीयांमुळे फसला. श्रीकांत शाहू गायकवाड असे लाचखोर प्रांताचे नाव आहे.वाळू माफीयांना वाळू सुरु करुन कारवाई न करण्यासाठी प्रांत लाच घेत होता.