ट्विटरवर का ट्रोल होतंय, ‘निक्की तंबोली औकात में रहे…’!

0
39

आज दुपारपासून ट्विटरवर ‘निक्की तंबोली औकात में रहे’ आणि दुसरा ‘अली सिर्फ जास्मीन का है,’ हे दोन ट्रेंड्स चर्चेत येऊ लागले आहेत. निक्कीवर अली आणि जास्मीनचे चाहते अचानक का भडकले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका, काही दिवसापूर्वी व्हीजे एंडी कुमारने निक्कीची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये तिला विचारलं, तुला अली गोनीसोबत डेटवर जायला आवडेल का?  यावर ती ‘हो’ असे म्हणाली.

त्याच्या विषयी माझ्या मनात अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे, असेही निक्की म्हणाली. तर जास्मीनचा कोणताही चाहता वर्ग नाही, असेही ती म्हणाली. याच कारणामुळे अली आणि जास्मिनचे फॅन्स निक्कीवर भडकले. तसेच आपल्याला सोशल मिडीयावर ट्रोल होताना पाहून निक्कीने ”माझ्याबद्दल बोलायला तुमच्याजवळ इतका वेळ आहे, हे बघून आनंद झाला. यासाठीही पैसे दिलेत का?’’, असे ट्विट तिने केले.