‘राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही, मात्र’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
38

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय मात्र संसर्ग वाढतोय. तसेच सध्या लसीकरणाचं प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बाधितांचा आकडा वाढू लागल्याने अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावतेय. असं देखील ते म्हणाले. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली आहे.