या खेळाडूला वाढदिवशीच झाली कोरोनाची लागण

0
38

सचिन तेंडुलकरसोबत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या खेळाडू सलील अंकोला यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या वाढदिवशी त्यांना कोरोना झाल्याचे कळाले. सलील यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला. त्यानंतर सलील यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळालीच नाही. त्यांनी १३ फेब्रुवारी १९९७ रोजी त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला होता. 

सलील यांना वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हाडाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यांना क्रिकेटला रामराम करावा लागला होता. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं व ते यशस्वी देखील झाले. तसेच सलील अंकोला बिग बॉस या रिआलिटी शोमध्येही दाखल झाले होते. सध्या २०२० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. अंकोला सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख आहेत.