लवकरच आई होणार हि गायिका, चाहत्यांना दिली गुड न्यूज !

0
47

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी आपल्या चाहत्यांसाठी  सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने फोटो पोस्ट करत लोकांना प्रेम आणि आशीर्वाद देण्याची विनंती या पोस्टद्वारे केलीये.

5 फेब्रुवारी 2015 रोजी पार्श्वगायिका श्रेया घोषालने तिचे बालपणीता मित्र शिलादित्यशी लग्न केले. श्रेया आणि शिलादित्य हे बालपण मित्र होते. शिलादित्य Hipcask.com वेबसाइटचे संस्थापक आहेत.

या शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रेयाने आपले दोनही हात बेबी बॅम्पवर ठेवले असून, ‘बेबी श्रेयादित्य येणार आहे! मला ही बातमी तुम्हाला सांगताना आनंद होतोय. आपल्या प्रेम आणि आशीर्वादांची आवश्यकता आहे, कारण आम्ही आमच्या जीवनात या नवीन अध्यायसाठी स्वतःला तयार केले आहे. ‘ श्रेयाने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवारांने तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यास सुरुवात केलीये.