45 वर्षांवरील सर्वांना मिळणार आता कोरोनाची लस

0
31

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 45 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना 1 एप्रिलपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. तसेच आतापर्यंत हि लस फक्त  45 ते 60 वर्षांमधील गंभीर आजारी व्यक्तींनाच दिली जात होती, मात्र आता हि लस 45 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना घेता येणार आहे. हि महिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

तसेच देशात आतापर्यंत 4.85 कोटी लोकांनी लस घेतली असून यातील 80 लाख कोटी लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. मागील 24 तासात सर्वाधिक 32.54 लाख डोस देण्यात आले आहेत, हि माहिती देखील त्यांनी दिली आहे.