‘ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना होणार नाही’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
46

कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधी ही कोरोनाला घाबरलो नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या गो कोरोनाच्या नाऱ्याचा उल्लेख करीत कोरोनाला मी कधीही घाबरलो नाही. राजभवनमध्ये सतत लोक मला भेटायला यायचे. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही.आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवनमध्ये भेटता तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही. कोरोनाला घाबरू नका तर काळजी घ्या ; खबरदारी घ्या; हात स्वच्छ धुवा; मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवनमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खुमासदार भाषणाची जुगलबंदी रंगली. यावेळी विचारमंचावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरयांचे वंशज होळकर; खासदार विकास महात्मे; दिग्दर्शक केदार शिंदे; माधव भंडारी; चित्रा वाघ; आयोजक सागा फिल्म्स फाउंडेशन चे सागर धापटे; आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य ऐतिहासिक क्रांतिकारी आहे. त्या अत्यंत शूर पराक्रमी होत्या.त्याच प्रमाणे तत्वज्ञानी न्यायदान करणाऱ्या लोककल्याण करणाऱ्या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या राणी होत्या.मनापासून त्यांनी जनतेची सेवा केल्याने लोककल्याणकारी राज्य केल्याने त्यांना लोकांनीच देवी उपाधी दिली.पुण्यश्लोक अहिल्यादेविचा मराठी जनतेला अभिमान आहे. धनगर समाजाचे त्या दैवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे. जे लोक लाईफ मध्ये फक्त वाईफसाठी काम करतात त्यांना पुरस्कार मिळत नाही तर जे लोक वाईफ ला सांभाळून लाईफमध्ये गरिबांची गरजूंची सेवा करतात;समाजसेवेत स्वतःला वाहून घेतात त्यांचा समाज पुरस्कार देऊन गौरव करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना लाभला त्यांचे यावेळी ना. रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. यावेळी खासदार छत्रपती उदयन राजे यांनी पुण्यश्लोक अहिक्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.यावेळी उदयन राजे महाराज यांनी ना रामदास आठवले यांचा आपले मोठे भाऊ असा उल्लेख करीत आदरभाव व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत भय्युजी महाराज यांना देण्यात आला. तो पुरस्कार त्यांची कन्या कुहू यांनी स्वीकारला.