आज नाना पटोले आंदोलकांची भेट घेणार तर उद्या प्रियंका गांधी शेतकरी पंचायतीस भेट देणार

0
49

देशात शेतकरी आंदोलन जोरात सुरु आहे. राष्ट्रीय पातळीवरच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा मुद्दा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. देशातील दिग्गज नेते आंदोलना ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही दिग्गज नेते आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात होते मात्र पोलिसांनी त्यांना भेटण्यास मज्जाव केला. आजही राज्यातील काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीतील टिकरी बॉर्डरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत आणि शेतकरी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. तत्पूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.

तर दुसरीकडे काँग्रसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी उद्या उत्तर प्रदेशच्या सहरानपूर येथील शेतकरी पंचायतीस भेट देणार आहेत. चिलखाना येथे 2 वाजता ही शेतकरी पंचायत भरणार आहे. तेथील सदस्यांशी प्रियंका गांधी संवाद साधणार