आज प्रियंका गांधी शेतकरी पंचायतीस संबोधित करणार

0
28

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज चिलकानामध्ये शेतकरी पंचायतीमध्ये संवाद साधणार आहे. तत्पूर्वी त्या शाकंभरी देवी मंदिरात नमन करण्यास जाणार आहे. शेतकरी पंचायतीद्वारे त्या आंदोलनावर आणि विविध मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत. या शेतकरी पंचायतीत मोठ्या संख्येने लोकं हजेरी लावण्याची शक्यता आहे. प्रशासनानं जिल्ह्यात कलम 144 लागू केली असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी 2 वाजता प्रियंका गांधी या पंचायतीत पोहोचतील.