टॉम अँड जेरी यांचा हिंदी सिनेमा लवकरच येणार भेटीस

0
25

लहानपणीच्या सर्वात सुंदर आठवणींपैकी एक आठवण म्हणजे टॉम अँड जेरी आणि हेच टॉम अँड जेरी आता पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या माध्यमातून टॉम अँड जेरीची मस्ती पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हिंदीतून टॉम अँड जेरीची जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक अधिकच उत्साही आहे. नुकताच टॉम अँड जेरी सिनेमाचा हिंदी डायलॉग प्रोमो आला आहे. प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अॅनिमेटेड टॉम अँड जेरी सोबत हॉलिवूड अभिनेत्री क्लो ग्रेस मोरेट्ज (CHLOE GRACE MORETZ) आणि अभिनेते मायकल पेना (MICHAEL PENA) दिसणार आहे. टीम स्टोरी यांनी टॉम अँड जेरी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

credit – @WarnerBrosIndia