टूलकिट प्रकरण: दिशा रविच्या अटकेनंतर राजकारण तापलं

0
22
source- twitter
source- twitter

टूलकिट प्रकरणात 22 वर्षीय पर्यावरणवादी दिशा रवि हिला अटक केल्यानंतर राजकारणाला ऊत आला आहे. शेतकरी आणि काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, शशि थरुर आणि अरविंद केजरीवाल यांनी अटकेचा निषेध केला आहे.

दुसरीकडे भाजपानेही पलटवार करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

पोलिसांनी दिशाला ग्रेटा थनबर्ग केलेली पोस्ट शेअर प्रकरणात अटक केली आहे. ग्रेटाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दिशाने ती पोस्ट सर्क्युलेट केली होती. मात्र त्यानंतर ग्रेटाने ती पोस्ट डिलीट केली.