टूलकिट प्रकरणी निकिता जॅकबला मुंबई हायकोर्टातून दिलासा

0
26

शेतकरी आंदोलनाशी निगडीत टूलकिट प्रकरणात आरोपी असलेल्या निकिता जॅकब हिला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाकडून निकिताला 3 आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. यामुळे दिल्ली पोलिसांना निकिताला 3 आठवडे अटक करता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी निकिताविरधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी निकिताचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे.