विमाना ऐवजी बसने करा लंडनपर्यंतचा प्रवास;’बस टू लंडन’ सेवेतुन ७० दिवसात पोहोचा लंडन

0
11

दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता

मात्र आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे

गुरगावमधली खासगी प्रवास कंपनीने १५ ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे

‘बस टू लंडन’ असं या सेवेचं नाव असून या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकता

७० दिवसांच्या दिल्ली ते लंडन या प्रवासात तुम्हाला १८ अन्य देशांमधून जावं लागेल

बस टू लंडन च्या या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत

एका व्यक्तीला या प्रवासासाठी १० देशांचा व्हिसा लागणार आहे

दिल्लीपासून लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे

यासाठी ईएमआचा पर्यायही देण्यात आला आहे

Leave a Reply