अमेरिकेच्या लोकप्रिय व्यंगात्मक बातमीपत्रात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा

0
31

अमेरिकेचा लोकप्रिय व्यंगात्मक बातमी कार्यक्रम दे डेली शोचे संचालक ट्रेवर नोआ यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. ट्रेवर नोआने ट्वीट करत शेतकरी आंदोलनाच्याबाबतीत एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ 8 मिनिटांचा असून यात शेतकरी कोणत्या मुद्द्यांमुळे लढा देत आहे, याबाबत सांगण्यात आलं आहे. जवळपास 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या रस्त्यांवर ठाण मांडून आहेत. नोआच्या आधी रिहाना, मिया खलिफा, ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत केलं होतं.