पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या तृप्ती देसाई

0
52

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये गुंता अजूनही वाढतच चालल्या आहेत. यामध्ये आता राजकीय पातळीवर सुद्धा आरोप प्रत्यारोपांची झळ बघायला मिळत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पूजा चव्हानच्या कुटुंबीयांची परळीत जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. यावेळी त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अन चौकशीला सामोरे जावे असे रोखठोक मत मांडले .तसेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असे सुद्धा त्या म्हणाल्या.मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झालेत ते संजय राठोड गेल्या 13 दिवसांपासून माध्यमांसमोर येणं टाळत आहेत.