ट्विटरने केंद्र सरकारची मागणी मान्य केली असून आक्षेपार्ह खाती बंद करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अटक तसेच दंड टाळण्यासाठी ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. हिंसक पोस्ट करण्याऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर #ModiPlanningFarmerGenocide हॅशटॅग पोस्टमुळे अमेरिकेची मायक्रो ब्लॉगिंग कंपनी मागील काही दिवसांपासून दबावात आहे.
केंद्र सरकारने सूचना दिल्यानंतर ट्विटरने संबंधित पोस्टवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आयटी अॅक्टनुसार सूचना व प्रसारण मंत्रालयाने पाठवलेल्या ट्विटर खात्यांवर देखरेख ठेवली जात आहे. आतापर्यंत ट्विटरने 709 ट्विटर खाती बंद केली आहेत. हॅशटॅगसह ट्विट केलेल्या 257 खात्यांचा यात समावेश आहे. यापूर्वी ट्विटरने 126 खाती बंद केली आहेत. या व्यतिरिक्त खालिस्तानी, पाकिस्तानशी संबंधित 1,178 खाती आहेत. त्यापैकी 586 खाती बंद करण्यात आली आहेत.