युझर्संना ट्विटरवरून पैसे कमवण्याची संधी; ट्विटरचे दोन फिचर लवकरच

0
42

ट्विटरवर आता युझर्संना कमाई करण्याची संधी मिळणार आहे, युझर्ससाठी ट्विटरने जबरदस्त फिचरची घोषणा केली आहे. एखाद्या विशिष्ट कंटेन्टसाठी फॉलोअर्सकडून पैसे कमवता येणार आहे. ट्विटरने सुपर फॉलो पेमेंट आणि कम्युनिटी अशा दोन फिचरची घोषणा केली आहे. यामध्ये बोनस ट्विट, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहोचणे तसेज न्यूजलेटरची मेंबरशीप याचा समावेश करण्यात आला आहे. याचा फायदा कंटेन्ट प्रोड्यूसर्सना होणार आहे. हे फिचर जवळपास यूट्यूबप्रमाणेच काम करेल. ट्विटरचं दुसरं कम्युनिटी फिचर हे अगदी फेसबुक ग्रुपसारख काम करेल. या फिचरद्वारे युझर्स आवडीनुसार आपले ग्रुप बनवू शकातत. त्या ग्रुपमध्ये इतर युझर्सनाही समाविष्ट करून घेऊ शकतात.