मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांना भेट दिली आणि कामाची पाहणी केली. त्याचबरोबर स्थानिक आदिवासींनी विकसित केलेल्या पर्यटनस्थळांची माहिती घेतली. जव्हारमध्ये पंतप्रधान आवाश योजनेतील घरकुल योजनेच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. जव्हार येथील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील खरवंद येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन अंगणवाडी सेविकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.