‘शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा, वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा’

0
25

मंत्रालयात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासोबत राज्यातील इतरही शासकीय, निमशासकीय कार्यालयात जंतुनाशके असावीत, तसेच फवारणी करून स्वच्छता राहील हे पाहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबर मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे दोन शिफ्टमध्ये वेळापत्रक तयार करण्यासाठी पावलं उचलण्यास सांगितले आहे. तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचेही नियोजन करण्यास सांगितले आहे