उद्धव ठाकरेंकडून पदाचा गैरवापर; किरीट सौमय्या यांचा गंभीर आरोप

0
23

कोर्लई येथील जमीन खरेदी प्रकरणात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सौमय्या यांनी केला आहे.

त्यासंदर्भात सौमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही यांनी तक्रारीत केलेला आहे. सात दिवसांत गुन्हा न दाखल झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या तक्रारीची पुढील ७ दिवसात दखल घेऊन गुन्हा दाखल झाला नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार करू, असा सोमय्या यांनी दिला आहे.

तसेच त्यांनी अलिबागच्या डीवायएसपी सोनाली कदम यांची भेट घेऊन तक्रारींचा ४०२ पानी दस्तऐवज सादर केला. यात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पुरावे दिल्याचे सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.