‘UN Human Rights’ची शेतकरी आंदोलनात उडी

0
36

कृषी कायद्याविरोधात आता आंतरराष्ट्रीय पटलावर पडसाद उमटू लागले आहेत. रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर आता युएन ह्युमन राईट्सने ट्विट करत शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. भारत सरकार आणि आंदोलकांनी संयम पाळावा असा सल्ला त्यांनी ट्विटमधून दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरक्षित राखले जावेत. तसेच मुद्द्यावर योग्य तो तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केले आहे.

दिल्ली सीमेवर पोलिसांनी बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते बंद केले आहेत. तसेच आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहेत.