अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची प्रकृती गंभीर, ट्रामा सेंटरमध्ये भर्ती

0
335

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती खालावल्याची माहिती मिळतेय. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला (Arun Gawali) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालवत आहे. अचानक अरुण गवळीची प्रकृती खराब झाली होती तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची कोरोना चाचणी केली होती.त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.