अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमधून आणले भारतात

0
36

अंडरवर्ल्ड डॉन रवी पूजारील आफ्रिकेतुन भारतात आणण्यात आले. त्याच्यावर खंडणी, हत्या या सारखे तब्बल २०० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे आफ्रिकेतील सेनेगल या देशातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले असून या प्रत्यार्पण प्रक्रियेत रॉ, आयबी तसेच भारतीय पोलिसांचे मोठे अधिकारी सामील होते.तसेच यानंतर त्याला बेंगळुरु पोलिसांच्या कस्टडीत देण्यात आलय.

रवी पुजारी विरोधात कर्नाटकात एकूण ९६ गुन्हे दाखल आहेत.त्यानंतर देशातील ज्या-ज्या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत त्या संपूर्ण ठिकाणच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळते.रवी पुजारीवर महाराष्ट्रात ४९ गुन्हे दाखल आहेत.तसेच २०१६ सालच्या हॉटेल गजाली फाररिंग प्रकरणात रवी पुजारीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.