उन्नाव प्रकरणी उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा उत्तर प्रदेश सरकारला टोला

0
32

उन्नावमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह आढळल्यानंतर राजकारणाला ऊत आला आहे. महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ट्विट करत उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘दुर्घटनेत वाचलेल्या पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत आणा, आम्ही तिला वैद्यकीय सुविधा पुरवतो आणि याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. आमच्या इथे भारतातील सर्वोत्तम रुग्णालय आहेत. त्यामुळे तिच्यावर मुंबईत उपचार झाले तर बरे होईल’ असं ट्विट त्यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली चारा घेऊन जाण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मुलींच्या काकांना कोणी तरी सांगितलं की, तिन्ही मुली शेतात पडलेल्या आहेत. काकांनी त्याठिकाणी धाव घेतली असता, त्यांची परिस्थिती पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यातील दोन मुलींना मृत घोषित केलं. तिसऱ्या मुलीची प्रकृतीही गंभीर असून, तिच्यावर कानपूरच्या रिजेंसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.