उन्नाव हत्याकांडाची उकल, दोन आरोपींना अटक

0
40

उन्नाव हत्याकांडाची उकल झाली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असून आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेत बचवलेल्या मुलीवर विनय नावाच्या मुलाचे प्रेम होते. विनयने तरुणीला प्रेमाची मागणी घातली होती. मात्र मुलीने त्याला नकार दिला होता. त्यानंतर संतापलेल्या विनयने तिला ठार मारण्याचा कट रचला. एकतर्फी प्रेम करत असलेली मुलगी ही इतर दोन मैत्रिणींसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होती. या संधीचा फायदा घेऊन विनयने मुलींना वेफर खायला दिले आणि विष कालवलेले पाणी प्यायला दिले. विनयने फक्त एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीली मारण्याचा कट आखला होता. मात्र सोबत असलेल्या दोन्ही मुलींनीही विष कालवलेले पाणी प्यायले. त्यात तिघी जणी शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्या आणि आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. एका व्यक्तीने या दोघांना घटनास्थळाहून पळ काढताना पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.