महाराष्ट्रात येत्या 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सरी बरसतील असा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे फळ बागायतदारांचं नुकसानीची शक्यता आहे. वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून जाईल.