अमेरिकेत कोरोना मृतांचा आकडा 5 लाखाच्या घरात

0
38

अमेरिकेत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. व्हाईट हाऊसमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळलं गेले. तसेच मेणबत्ता पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर शासकीय इमारतींवर झेंडा पाच दिवस खाली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शोक प्रस्तावात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. जगात एकूण 25 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 20 टक्के मृत्यू हे एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोना मृतांची संख्या दुसरं महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि कोरिया युद्धात मृत पावलेल्या सैनिकांच्या बरोबरीने आहे. अमेरिकेचे दूसऱ्या महायुद्धात 4,05,000, व्हिएतनाम युद्धात 58000 तर कोरियाई युद्धात 36000 लोकांचा मृत्यू झाला होता.