जॉन्सन अँड जॉन्सच्या लसीला अमेरिकेत मंजुरी

0
27

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीला अमेरिकेत मंजुरी देण्यात आली आहे.. मॉडर्ना आणि पीफायझर या लसीनंतर अमेरिकेत मंजुरी मिळाली ही तिसरी लस आहे. इतर लसींच्या तुलनेत या लसीचा केवळ एक डोस दिला जाणार आहे. एफडीएने 22 मतांनी या लसीला परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे तीन देशात वैद्यकीय चाचणी झाली आहे. अमेरिकेत 85.9 टक्के, दक्षिण आफ्रिकेत 81.7 टक्के आणि ब्राझीलमध्ये 87.6 टक्के लस सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय चाचणीत या लसीचे केवळ 2.3 टक्के साईड इफेक्ट दिसून आले.

अमेरिकेत आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे लसीचा एक डोस दिल्याने कोरोनाचा फैलाव रोखणारी लस आवश्यक होती. त्यामुळे या लसीचा खूप फायदा होणार आहे.