जम्मू काश्मीरवर अमेरिकेचे ट्विट, पाकिस्तानने घेतला आक्षेप

0
35

अमेरिका प्रशासनाने काश्मीरवर एक ट्विट केले आहे. यामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये ४जी इंटरनेट सुविधा सुरू झाली असल्याचा उल्लेख केला असून यामध्ये भारताच्या निर्णयाचे स्वागत सुद्धा केले आहे. पाकिस्तानने या ट्विटची दखल घेत यावर आक्षेप घेतला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार जम्मू-काश्मीरच्या मुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक प्रस्तावांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.