कु अँपवरून युजर्सचा पर्सनल डेटा लीक, चीनशी कनेक्शन?

0
36

स्वदेशी ट्विटर म्हणून बाजारात ओळख निर्माण करणाऱ्या कु अँप (koo app)बाबद धक्कादायक माहिती समोर येत आहे.एका फ्रेंच सिक्युरिटी रीसर्चनुसार कु अँप सुरक्षित नसून युजर्सचा वयक्तिक डेटा यामधून लिक होत आहे.फ्रेंच सिक्युरिटी संशोधक रॉबर्ट म्हणाले ‘कु बद्दल काही रिसर्च केले मात्र यामध्ये ते सुरक्षित नसल्याचे आढळून आले’ त्यांनी याबाबद ट्विट केले आहेत यासह एक स्क्रिन शॉट सुद्धा शेअर केला आहे .ज्यामध्ये याबाबद स्पष्ट दिसून येत आहे. आतापर्यत लाखो युजर्सचा डेटा ज्यांमध्ये नाव,जन्मतारीख, मोबाईल नंबर तसेच वैवाहिक स्थिती याचा समावेश आहे तो लिक झाला आहे. यामध्ये चिनी कनेक्शन असल्याचे सुद्धा समोर येत आहे.कु च्या कंपनीत शुनवेई ची गुंतवणूक आहे.मात्र शुनवेई लवकरच आपली हिस्सेदारी विकत असल्याचे म्हटले जात आहे.