ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी घेतली लस,लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात

0
42

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला सुरवात झाली आहे. याला हिरवा कंदील देत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: शनिवारी लस घेतली. याशिवाय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही लस घेऊन पोलीस कर्मचारी, अधिका:यांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.
ठाण्यातील सिव्हील रूग्णालयात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे लसीकरण पार पडले. दिल्ली येथील या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दक्षता पथकाने सिव्हील रूग्णालयाला भेट देऊन केंद्रांतील लसीकरणाच्या नियोजनासह आतार्पयतच्या कामकाजाची माहिती घेतली.