ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

0
75

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन झालं आहे. त्यांनी त्या काळात साठपेक्षा जास्त नाटकांमध्ये तसेच पन्नासहून जास्त चित्रपटांत काम केले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे. 

शाळेत असतानाच त्यांनी आपली आवड नाट्य अभिनय निवडली, आणि त्या मार्गावर त्यांनी चालायला सुरुवात केली. श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता या बरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद होते, उत्तम सुगम संगीत गायकही होते.

यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. ’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला. नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.