विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत ‘सामना’

0
25

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीत कुरबूर सुरू झाली आहे. सामना अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे काढण्यात आले आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सल्ला देण्यात आला आहे.

‘काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद हे पाच वर्षांसाठी दिले होते. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. आता यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार आहे. मात्र या निर्णयाचा सरकार, विधानसभा आणि बहुमताचा आकडा यावर परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल’

‘राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष अद्यापि मिळू शकला नाही. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्या पुढाकाराने 23 नेत्यांनी काँग्रेसला अध्यक्ष द्या अशी मागणी केली आहे.’

राज्यात विधानसभा अध्यक्षपदाची बेरीज वजाबाकी पाहता निवडणूक कठीण असेल, असेच एकंदरीत आजच्या अग्रलेखातून जाणवत आहे.