विधानसभा उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपाची आज बैठक

0
38

भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी, तामिळनाडू आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी या आठवड्यात जारी करणार आहे. आज पश्चिम बंगालच्या कोर ग्रुपसोबत बैठकीनंतर रणनिती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहे. तसेच प्रचारसभांबाबतही व्यूहरचना आखली जाणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभेसाठी सर्वाधिक मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये 20 तर आसाममध्ये 6 सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे.