विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचेच – विश्वजीत कदम

0
37

सांगली: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर महाविकासआघाडीत कुरबूर सुरु झाली आहे. त्यावर मंत्री विश्वजीत कदम यांनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट केले आहे. कोण अध्यक्ष होणार हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील असंही त्यांनी पुढे सांगितले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसचे कान टोचण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षपदाचे बेरीज वजाबाकी त्यात मांडण्यात आली होती. त्यामुळे मंत्री विश्वजीत कदम यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून मंत्री विश्वजीत कदम यांनी केंद्र सरकार टीकेची झोड उठवली. केंद्र सरकार हुकूमशाहीने वागत असल्याचे टीका करत भाजपाला इतिहास कधीच माफ करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. सांगलीत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.