“वाघवाली ताई” यशवंती घाणेकर यांचे निधन

0
52

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजात “वाघवाली ताई ” म्हणून परिचित असणाऱ्या यशवंती वसंत जामदार-घाणेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर अन इतरत्र भागातील हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांचे नातेवाईक, जबर जखमी होणाऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून दिल्यामुळे यशवंती घाणेकर यांना वाघवाली ताई अशी ओळख मिळाली होती.
सुरुवातीला कम्युनिस्ट पक्ष अन नंतर स्वतःच्या श्रमिक मोर्चा आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून यशवंती घाणेकर गेली ५१ वर्षे आदिवासी समाजासाठी विविध यंत्रणांशी लढा दिला होता. यशवंती घाणेकर यांची शोकसभा रविवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.